सिंगल पापा सीरिजमध्ये कुणाल
मडगाव एक्स्प्रेस चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणारा कुणाल खेमू आता सीरिज साकारतोय. कुणालने आता स्वत:ची आगामी वेबसीरिज सिंगल पापामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून दुहेरी भूमिका बजावली आहे. ही एक फॅमिली ड्रामा कॉमेडी सीरिज असून ती 12 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाणार आहे.
नेटफ्लिक्सने सिंगल पापा सीरिजचे पोस्टर शेअर करत कलाकारांची माहिती जाहीर केली आहे. छोटा पॅकेट आणि अत्यंत मोठा धमाका, गहलोत परिवाराच्या क्लेशात तुमचे स्वागत आहे. 12 डिसेंबर रोजी सिंगल पापा नेटफ्लिक्सवर पाहणे विसरू नका अशी कॅप्शन पोस्टरला नेटफ्लिक्सकडून देण्यात आली आहे.
कुणाल खेमूसोबत या सीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, मनोज पहवा आणि नेहा धूमिका यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. या सीरिजची कहाणी पत्नीशिवाय मुलाचे पालनपोषण करणाऱ्या पुरुषावर आधारित आहे. मुलाचे पालनपोषण करण्यासाठी पुरुषाला किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे यात दर्शविण्यात येणार आहे.