महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक कुमारी शैलजा

06:05 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस खासदार आणि दिग्गज नेत्या कुमारी शैलजा यांच्या कथित नाराजीची चर्चा जोरदार सुरू आहे. बसप आणि भाजपने त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देखील दिली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न करण्यात आल्याने आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे मानले जात आहे. याचदरम्यान कुमारी शैलजा यांनी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे वक्तव्य केले आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न देणे हा पक्षाचा निर्णय आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कुणीही दावेदारी करू शकतो. वरिष्ठतेची पातळी देखील आहे. माझ्या बोलण्यामुळे काही लोक घाबरत असावेत. मला देखील येथवर पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. हरियाणात एक व्हिजन सादर करण्याची माझी इच्छा होती आणि आहे देखील असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

राजकारणात सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागते. शैलजाची लढाई केवळ स्वत:साठी नव्हे तर दुर्बल वर्गासाठी आहे. मी ज्या समुदायात जन्मले केवळ त्यापुरती ही बाब मर्यादित नाही, महिलांसाठी देखील बोलले जाण्याची गरज असल्याचे शैलजा यांनी म्हटले आहे.

भाजपचे जे नेते माझ्याबद्दल टिप्पणी करत आहेत, त्यांच्याहून अधिक मोठा माझा राजकीय प्रवास राहिला आहे. अशा स्थितीत मला कुणाकडूनही सल्ल्याची गरज नाही. मी स्वत:ची वाटचाल करणे जाणते. भाजप किंवा अन्य पक्षाकडून माझ्याबद्दल केवळ भ्रम पसरविला जात आहे. माझ्या रक्तात काँग्रेस असल्याचे शैलजा यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article