कुमार शेट्ये यांची पोकळी कायम जाणवेल ; राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
रत्नागिरी :
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी दुपारी रत्नागिरीतील शिरगाव येथे शेट्ये यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केलं. तसेच कुमार शेट्ये यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कुमार शेट्ये यांच्यासारखा निष्ठावंत, प्रामाणिक, आणि शरद पवार साहेब यांच्यावर निष्ठा असणारा एक मोठा नेता आमच्या पक्षाने गमावला आहे. त्यांची पोकळी आम्हाला कायम जाणवेल, अशा भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, बशीर मुर्तुझा, नलिनी भुबड, नीलेश भोसले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी कुमार शेट्ये यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. शेट्ये यांचे चिरंजीव सुरज शेट्ये यांना तात्काळ पत्र पाठवून श्रद्धांजली वाहिली होती.