For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुमार धर्मसेना, रिचर्ड इलिंगवर्थ भारत-पाक सामन्यासाठी पंच

06:28 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुमार धर्मसेना  रिचर्ड इलिंगवर्थ भारत पाक सामन्यासाठी पंच
Advertisement

आयसीसीने केली घोषणा, मेनन चौथ्यांदा तर पद्मनाभन पहिल्यांदाच नियुक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार असून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित केला जाणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना उत्कंठावर्धक असतो. या बहुचर्चित सामन्याबाबत आता आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ या दोन दिग्गज पंचाची नियुक्ती आयसीसीने केली आहे.

Advertisement

आयसीसीने टी-20 विश्वचषक 2026 च्या ग्रुप स्टेजसाठी मॅच ऑफिशियल्सची घोषणा शुक्रवारी केली. यामध्ये 24 ऑन-फील्ड अंपायर आणि 6 मॅच रेफरी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुपर 8 आणि नॉकआउट फेऱ्यासाठी ऑफिशियल्स नंतर जाहीर केले जाणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. भारत-पाक या महामुकाबल्यासाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे ऑनफील्ड अंपायर असतील. कुमार धर्मसेना यांनी यापूर्वीही अनेक मोठ्या सामन्यांत अंपायरिंग केली असून, त्यामध्ये 2016 आणि 2022 च्या टी-20 विश्वचषक फायनलचा समावेश आहे. दुसरीकडे, रिचर्ड इलिंगवर्थ यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कोलकात्यात स्कॉटलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या ग्रुप सी सामन्यात नितीन मेनन आणि सॅम नोगाजस्की हे अंपायरिंग करतील. दरम्यान, टीम इंडिया आपला पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी पॉल रायफल आणि रॉड टकर यांची ऑन-फील्ड अंपायर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे नितीन मेनन हे चौथ्यांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये पंचगिरी करणार आहेत तर अंनत पद्मनाभन हे पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत पंचांचे काम पाहणार आहेत. या पॅनेलमध्ये असणारे आणखी एक भारतीय पंच जे. मदनगोपाल दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये पंचांचे काम पाहणार आहेत.

टी-20 विश्वचषक 2026 साठी मॅच ऑफिशियल्स

मॅच रेफरी - डीन कॉस्कर, डेव्हिड गिल्बर्ट, रंजन मदुगले, अँड्य्रू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन, जवागल श्रीनाथ.

अंपायर- रोलँड ब्लॅक, क्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, अॅड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, वेन नाइट्स, डोनोव्हन कोच, जयरमन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाजस्की, के. एन. ए. पद्मनाभन, अल्लाहुद्दीन पालेकर, अहसान रजा, लेस्ली रीफर, पॉल रायफल, लँग्टन रूसेरे, गाजी सोहेल, शरफुद्दौला इब्ने शाहीद, रॉड टकर, अॅलेक्स व्हार्फ, रविंद्र विमलासिरी, आसिफ याकूब.

Advertisement
Tags :

.