For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

04:20 PM Jul 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Advertisement

कुडाळ -

Advertisement

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान (सिंधुदूर्ग ) च्यावतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळदेशकर ज्ञातीतील दहावी - बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कुडाळ येथील बँ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पिंगुळी येथील आयुर्वेदिक डॉ अनंत सामंत होते. यशाचा आनंद मिळविण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ जपणे गरजेचे आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ,व्यायाम महत्त्वाचा आहे,तर मानसिक स्वास्थासाठी अध्यात्माकडे वळा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.व्यासपीठावर श्रीमठ संस्थान ( दाभोली ) महामंडळाचे अध्यक्ष गुरूनाथ प्रभू खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते आमित सामंत, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, वेतोरे हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा समिती (कणकवली ) चे अध्यक्ष सुरेश सामंत,प्रतिष्ठानचे सहसचिव डॉ सुधाकर सामंत ,कुडाळ हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका सुलभा देसाई ,देवगडच्या नगरसेविका हर्षा ठाकूर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमात पुढाकार घेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्ञाती बांधवांची विविध क्षेत्रात नियुक्ती व सन्मान झाल्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठानच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. यात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून ( जि.प.सिंधुदुर्ग ) पदोन्नती मिळाल्याबद्दल डॉ. सुधाकर ठाकूर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिल मेंबरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजन सुरेश नाईक , सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून ( पं.स.मालवण ) पदोन्नती मिळाल्याबद्दल प्रफुल्ल वालावलकर, कोकण रेल्वे प्रशासनाकडून उत्कृष्ट तिकीट तपासणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले श्रीकृष्ण सामंत, अस्तित्व फाउंडेशन (सोलापूर ) या संस्थेमार्फत रंगसाधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले केदार सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिल मेंबर पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनोज वालावलकर , रंगगंध दिव्यांग कलाकारांच्या प्रायोगिक नाटकाचे लेखन (मुंबई ,बेंगलोर येथे 10 प्रयोग सादरीकरण) करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ प्रणव प्रभू या सात जणांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रतिष्ठानच्यावतीने दहावी पटिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अर्पिता अमेय सामंत ( परुळे ) हिच्यासह अन्य दहावी तसेच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल,श्रीफळ, भेटवस्तू व रक्त चंदनाचे रोप देऊन गौरव करण्यात आला.

प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान ( सिंधुदूर्ग ) ही संस्था ज्ञातीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. सदर सस्था अधिकृत नोंदणी करण्यात आली.या प्रतिष्ठानचा विशिष्ट लोगो बनविण्यात आला आहे.त्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सदस्य अमित तेंडोलकर यानी, सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे खजिनदार प्रफुल्ल वालावलकर यांनी केले ,तर आभार प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मण ( गुरू ) देसाई यांनी मानले. गुणवंत विद्यार्थी व त्याचे पालक तसेच ज्ञाती बांधव - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.