जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत कुडाळ रामकृष्ण हरि सेवा संघ मंडळ प्रथम
न्हावेली /वार्ताहर
दांडेली येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत कुडाळचे श्री रामकृष्ण हरि सेवा संघ पाट,भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ अणसूर द्वितीय तर कणकवलीच्या श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेला श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.या स्पर्धेत एकूण सात भजन संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे --- उत्कृष्ट हार्मोनियम योगेश मेस्री ( श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ) उत्कृष्ट गायक -आशिष सडेकर ( श्री रामकृष्ण हरि सेवा संघ पाट,कुडाळ ) उत्कृष्ट पखवाज - शुभम गावडे ( श्री रामकृष्ण हरि सेवा संघ पाट,कुडाळ ) उत्कृष्ट तबला - ओंकार मेस्री ( श्री सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ अणसूर ) उत्कृष्ट झांजवादक - सिद्धेश चव्हाण ( महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ) उत्कृष्ट कोरस - ( श्री सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ,अणसूर ) शिस्तबद्ध संघ - ( सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवली ) यांची निवड करण्यात आली.स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना १५,००० रुपये,११,००० रुपये,७,००० रुपये व चषक तसेच गायक, हार्मोनियम,पखवाज,तबला,झांजवादक,कोरस,शिस्तबद्ध संघ,यांना प्रत्येकी १००० रुपये व चषक सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून दिप्तेश मेस्री व भावेश राणे यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले.