For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ-मालवणमधील 9 तलाठी कार्यालयांसाठी 1 कोटी 48 लाखांचा निधी मंजूर; निलेश राणेंच्या शिफारशीला यश

कुडाळ मालवणमधील 9 तलाठी कार्यालयांसाठी 1 कोटी 48 लाखांचा निधी मंजूर  निलेश राणेंच्या शिफारशीला यश
Advertisement

कुडाळ/मालवण : कुडाळ आणि मालवण तालुक्यांतील जीर्ण झालेल्या तसेच स्वतंत्र कार्यालयाची सुविधा नसलेल्या तलाठी सजांसाठी नवीन इमारती उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण 1 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

या निधीतून कुडाळ तालुक्यातील सात आणि मालवण तालुक्यातील दोन अशा एकूण नऊ तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे.

कुडाळ तालुक्यातील गोठोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी 23 लाख रुपये, आंब्रड तलाठी कार्यालयासाठी 14 लाख, कुंदे 14 लाख, घोटगे 14 लाख, निरूखे 14 लाख आणि वर्दे तलाठी कार्यालयासाठी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी 22 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Advertisement

मालवण तालुक्यातील किर्लोस तलाठी कार्यालयासाठी 14 लाख, तर मसुरे देऊळवाडा तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्याने तसेच काही ठिकाणी स्वतंत्र कार्यालयीन इमारत उपलब्ध नसल्याने तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना कामकाज करताना अडचणी येत होत्या. नवीन इमारती उभारल्यानंतर महसूल विभागाचे कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

या निधीमुळे संबंधित गावांमधील नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या या कामांमुळे कुडाळ आणि मालवण तालुक्यांतील महसूल यंत्रणेला आवश्यक पायाभूत सुविधा मिळणार आहेत.

Advertisement
Tags :

.