For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आट्या - पाट्या स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरावर झेप

11:32 AM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आट्या   पाट्या स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरावर झेप
Advertisement

कोल्हापूर विभागाचे करणार नेतृत्व.

Advertisement

कुडाळ -

कमशिप्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने विभागीय स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली, सातारा व रत्नागिरी या दिग्गज संघाना नमवून विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. या यशानंतर या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बाजी मारली आहे.या स्पर्धेत हा कुडाळ हायस्कूलचा हा संघ कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार हे कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषणावह आहे.राज्यस्तरीय स्पर्धा धाराशिव जिल्ह्यात होणार आहे.तसेच 19 वर्षाखालील मुलींचा संघ कांस्यपदक विजेता ठरला.या विभागीय स्पर्धेतील कुडाळ हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या विजेत्या संघात कर्णधार लावण्या गावडे, जैलेशा तेजम, जुई चव्हाण , सुष्टी शेटकर, वैदवी कर्पे, स्वरा जाधव ,शालिनी दळवी, वैभवी राणे, रोशनी कदम, दुर्वा देसाई, तनया घोगळे, चित्राली कुंभार. या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम सामन्यात लावण्या गावडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच 19 वर्षाखालील मुलींचा संघ कांस्यपदक विजेता ठरला या संघाची कर्णधार तन्वी बांबूळकर ,ज्योती चव्हाण, मैमोनिसा शहा, कार्तिका परब , मनस्वी पाटील, प्रीती बावकर, पूर्वा सावंत, नम्रता गोसावी , दुर्वा पाटील , दिव्या आगलावे , दिया परब, हर्षदा तेली या खेळाडूंचा समावेश होता. उपांत्य फेरी मध्ये दिव्या आगलावे व मनस्वी पाटील यांनी उत्कृष्ट कामगिऱी केली.या दोन्ही संघातील खेळाडूना प्रशालेतील जेष्ठ क्रीडा शिक्षक विजय मयेकर व रामचंद्र खाकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्यावतीने पदाधिकारी उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, का.आ.सामंत, आनंद वैद्य, श्री.सुरेश चव्हाण, महेंद्र गवस तसेच कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य नारायण साळवी, पर्यवेक्षक रंजन तेली, कुडाळ हायस्कूल क्रीडा विभाग प्रमुख विजय मयेकर ,क्रीडा शिक्षक अनिल पोवार, वैभव कोंडसकर, सिद्धार्थ बावकर आणि शिक्षकेतर कर्मचारी,पालकांनी विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले व धाराशिव जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.