For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ - माड्याचीवाडीत काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉलीचा अपघात

03:32 PM Jan 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ   माड्याचीवाडीत काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉलीचा अपघात
Advertisement

वार्ताहर/ कुडाळ -

Advertisement

कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉलीचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्याने सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रॉली येथे कॉलवेलगत खाली पलटी झाली . या अपघातात वाहनाच्या केबिनमध्ये चालक अडकला होता. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्पर मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

Advertisement
Advertisement
Tags :

.