For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंगणेवाडी ,नेरूर यात्रोत्सवातून कुडाळ आगाराला साडे सहा लाखाचे उत्पन्न

04:11 PM Feb 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आंगणेवाडी  नेरूर यात्रोत्सवातून कुडाळ आगाराला साडे सहा लाखाचे उत्पन्न
Advertisement

वार्ताहर/कुडाळ

Advertisement

कुडाळ एसटी आगारातून आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सवासाठी व नेरुर येथील श्री देव कलेश्वर महाशिवरात्रोत्सवाला दरवर्षी ज्यादा वाहतूक केली जाते. यातून आगाराला चांगले उत्पन्न मिळते. कुडाळ आगाराकडून आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी दोन दिवसाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी 202 फेऱ्यांची जादा वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीचा 12,676 प्रवाशांनी लाभ घेतला. जादा वाहतुकीमधून सर्व सवलतीसह कुडाळ आगाराला 6 लाख 35 हजार 118 रु. उत्पन्न मिळाले, तर नेरुर येथील श्री देव कलेश्वर महाशिवरात्रोत्सवासाठी ६४ फेऱ्याची वाहतूक करून ४४४ किमी. प्रवासातून ३३ हजार सातशे ८६ रु. उत्पन्न सवलत मूल्यासह मिळाले. या वाहतूकीचा २९५३ प्रवाशांनी लाभ घेतला, अशी माहिती कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक यांनी दिली.आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सवासाठी व नेरुर येथील श्री देव कलेश्वर महाशिवरात्रोत्सवाला कुडाळ आगारातून दरवर्षी ज्यादा वाहतूक केली जाते. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच हा यात्रोत्सव दोन दिवस असतो. त्यामुळे भाविकांची अलोट गर्दी असते. बाहेरुन येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा मिळावी म्हणून कुडाळ एसटी आगारातू दरवर्षी ज्यादा वाहतूक केली जाते. तसेच नेरुर महाशिवरात्रोत्सवासाठी देखील एसटी प्रशासनाकडून ज्यादा वाहतूक केली जाते. मुबंई, पुणे, गोवा आदी शहरातून येणाऱ्या भाविकांना एसटी प्रशासनाकडून चांगली सेवा दिली जाते. त्यासाठी प्रशासन अगोदरच नियोजनाच्या तयारीत असते. त्यातून आगाराला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते.

Advertisement
Advertisement
Tags :

.