For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुब्रा सैतला मिळाली मोठी संधी

06:41 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
कुब्रा सैतला मिळाली मोठी संधी
Advertisement

शाहिद कपूरसोबत झळकणार

Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची यापूर्वीच घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘देवा’ असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. आता या चित्रपटात अभिनेत्री कुब्रा सैत देखील दिसून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सेक्रेड गेम्स या सीरिजमुळे ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कुब्रा पुन्हा एकदा शाहिद कपूरसोबत झळकणार आहे. दोघेही यापूर्वी फर्जी या वेबसीरिजमध्ये एकत्र दिसून आले होते. शाहिदसोबत पुन्हा काम करण्यासाठी कुब्रा सैत अत्यंत उत्सुक आहे.

Advertisement

चित्रपटात शाहिद कपूर हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर कुब्रा सैतच्या भूमिकेबद्दल कुठलाच खुलासा करण्यात आलेला नाही. पूजा हेगडे या थ्रिलर चित्रपटात मुख्य नायिका म्हणून काम करणार आहे. देवा हा चित्रपट पुढील वर्षी दसऱ्याच्या सणावेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहिद कपूरचा फर्स्ट लुक यापूर्वीच सादर करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.