For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

. ‘केटीएम’ने वाहनांच्या किमती वाढवल्या

06:32 AM May 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
  ‘केटीएम’ने  वाहनांच्या किमती वाढवल्या
Advertisement

केटीएम आरसी 200 आता 2.33 लाखांना उपलब्ध

Advertisement

मुंबई :

ऑस्ट्रेलियन दुचाकी उत्पादक केटीएमने गुरुवारी (15 मे) भारतीय बाजारपेठेत त्यांच्या सर्व वाहनांच्या किंमती 15,000 रुपयांनी वाढवल्या. सर्व दुचाकींमध्ये, केटीएम आरसी 200 ची किंमत 15,000 रुपयांनी सर्वाधिक वाढली आहे. यामुळे ती तिच्या प्रतिस्पर्धी यामाहा आर15 व्ही4 पेक्षा 49,000 रुपये महाग झाली आहे.

Advertisement

याशिवाय, 250 ड्यूक आणि आरसी 390 या दोन्हींच्या किमती 5,000 रुपयांनी वाढल्या आहेत. नवीन किंमती लागू झाल्यानंतर केटीएम आरसी 390 ही सर्वात महागडी बाईक आहे आणि केटीएम 250 ड्यूक ही सर्वात स्वस्त बाईक आहे.

सर्वात लोकप्रिय दुचाकी केटीएम 390 ड्यूकची वैशिष्ट्यो

केटीएमने 12 मार्च रोजी भारतीय बाजारात नेकेड अॅडव्हेंचर बाईक 390 ड्यूकचे अपडेटेड 2025 मॉडेल लाँच केले. ते अपडेटेड फीचर्स आणि नवीन स्टील्थ एबोनी ब्लॅक कलर ऑप्शनसह सादर करण्यात आले. नवीन केटीएम 390 ड्यूकमध्ये क्रूझ कंट्रोल आणि क्रॉल फंक्शन सारखी फीचर्स समाविष्ट आहेत. यापूर्वी, कंपनीने 2025 केटीएम 390 अॅडव्हेंचर दुचाकींमध्ये ही फीचर्स समाविष्ट केली होती. इन्स 390 ड्यूक आता लांब हायवे राईड्ससाठी अधिक आरामदायी आहे. याशिवाय, बाईकमध्ये एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी सुरक्षा वैशिष्ट्यो आहेत.

Advertisement
Tags :

.