For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिवहनच्या ‘पल्लक्की बस’ला राणेबेन्नूरनजीक भीषण आग

11:00 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
परिवहनच्या ‘पल्लक्की बस’ला राणेबेन्नूरनजीक भीषण आग
Advertisement

बेंगळूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या ‘पल्लक्की’ (पालखी) बसला भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी हावेरी जिल्ह्याच्या राणेबेन्नूर तालुक्यातील देवरगुड्ड येथे घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. दुर्घटनाग्रस्त पल्लक्की स्लीपर बस (क्र. केए-57 एफ 6680) बेंगळूरहून गदगला निघाली होती. बसमधून 17 जण प्रवास करत होते. तांत्रिक समस्येमुळे बसला अचानक आग लागली. ही बाब समजताच बसचालक फकिरप्पा याने बस थांबवून तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरविले. काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक लाईनमधील तांत्रिक समस्येमुळे बसला आग लागल्याचे सांगितले जात आहे. बसचालकाने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तरी उपयोग झाला नाही. काही वेळाने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. परंतु, संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. राणेबेन्नूर ग्रामीण पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.