For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कान पिळताच केएसआरपी जवान हजर

11:01 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कान पिळताच केएसआरपी जवान हजर
Advertisement

बेळगाव : मार्केट पोलीस उपनिरीक्षकांकडून केएसआरपी जवानांना धारेवर धरल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यामुळे बंदोबस्तासाठी असणारे जवान मंगळवारी खडबडून जागे होऊन तातडीने सेवेत हजर झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कान पिळताच  जागे झाल्याची प्रतिक्रिया अनेकांतून व्यक्त करण्यात येत होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, मोर्चे वारंवार येत असतात. त्यामुळे या भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केएसआरपी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून बराचवेळ प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. अधिकाऱ्यांनाही बाहेर पडणे कठीण झाले होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून सेवेत कसूर केल्याने मार्केट पोलीस उपनिरीक्षकांनी केएसआरपी पोलिसांना धारेवर धरून कार्यतत्पर राहण्याची सूचना केली होती. त्यामुळे मंगळवारी तैनात करण्यात आलेल्या केएसआरपी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होताच तातडीने हजर होऊन सेवा बजावली.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा निदर्शनास आल्याने अनेकांकडून उत्सुकतेने पाहिले जात होते. मार्केट पोलिसांकडून धारेवर धरण्यात आल्याने केएसआरपी जवान तातडीने दाखल होऊन सेवा बजावत असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.