महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री संतोष लाड यांच्यावरील टीकेचा क्षत्रिय मराठा परिषदेकडून निषेध

10:49 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांना इशारा

Advertisement

बेळगाव : मंत्री संतोष लाड यांच्याबद्दल भाजप राज्य अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली गेली आहे. ही निषेधार्ह बाब आहे, असे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे बेळगाव तालुका अध्यक्ष बसवराज मॅगोटी यांनी सांगितले. भाजप राज्य अध्यक्ष विजयेंद्र यांनी प्रसारमाध्यमांसमोर मंत्री संतोष लाड यांच्याबाबत खालच्या पातळीवर  टीका केली आहे, याचे आपण खंडन करतो. संतोष लाड एक मंत्री असून मराठा समाजाचे नेते आहेत. भाजप राज्य अध्यक्षांकडून मराठा समाजाच्या एका नेत्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हा मराठा समाजाचा अवमान आहे, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी लढले आहेत. संतोष लाड प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारसंघातील नागरिकांचे मत जाणून घेतल्यास त्यांनी केलेली जनसेवा व त्यांचे कार्य लक्षात येते. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानापेक्षा अधिक खर्च करून जनसेवा करत आहेत, हे भाजप अध्यक्षांनी लक्षात घ्यावे.  एका जबाबदार नेत्याने योग्यरीतीने बोलणे आवश्यक असते. समाजातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र घेऊन प्रतिनिधित्व केले पाहिजे. कोणत्याही एका समाजाचे प्रतिनिधित्व करू नये, अथवा दुसऱ्या समाजाला कमी लेखू नये, असे त्यांनी सांगितले. याबाबत तालुक्यातील क्षत्रिय मराठा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article