केएसएतर्फे फुटबॉल संघ-खेळाडू नोंदणी आजपासून
२० डिसेंबरपर्यंत किक ऑफ शक्य
नावनोंदणीला 11 डिसेंबर पर्यंत मुदत
कोल्हापूर
यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे (केएसए) फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणीची प्रव्र्रीया आजपासून सुरू होत आहे. नाव नोंदणीची प्रक्रीया बुधवार दि.११ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. नोंदणीची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर २० डिसेंबरपर्यंत यंदाचा किक ऑफ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संघ व खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रीया सुरू होणार असल्याने संघ व्यवस्थापक व खेळाडूंची लगबग सुरू झाली आहे. त्याचबरोबर फुटबॉल प्रेमींना हंगाम पाहण्याची उत्सुकता लागली आहे. आजपासून दि. 9 डिसेंबर पर्यंत सायंकाळी 5 ते 7 यावेळेत नोंदणी होणार आहे. यामध्ये 10 व 11 डिसेंबर रोजी विलंब नोंदणी होणार आहे. शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत नोंदणी होणार आहे. नेंदणीसाठी संघ व खेळाडूंनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील केएसए कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाचा हंगाम पुढील 15 ते 20 दिवसात सुरू होणार असल्याने केएसएतर्फे तयारीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. मैदान सुसज्य करण्याची लगबग सुरू झाली आहे. मैदानावरील गवत काढण्याची काम पुर्ण झाले आहे. केएसच्या नियमावलीनुसार प्रत्येक संघामध्ये कमीतकमी 20 व जस्तीतजास्त 20 खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे.बाहेरील जिल्ह्यातील 3 खेळाडूंची नेंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी केएसए कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.