क्रिस्टल डिसूजा पडली आहे प्रेमात
अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा सध्या स्वत:च्या लव्हलाइफवरून चर्चेत आहे. दुबईतील एका उद्योजकासोबतचा तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्रिस्टलने इन्स्टाग्राम पेजच्या स्टोरी सेक्शनमध्ये एक फोटो पोस्ट केला असून यात ती एकासोबत दिसून येत आहे, परंतु त्या इसमाचा चेहरा अभिनेत्रीने छायाचित्रात लपविला आहे. फोटोत क्रिस्टलच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दिसून येत नाही, परंतु दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसून येत आहे. तर स्वत:च्या पोस्टमध्ये क्रिस्टलने रेड हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. दुबईतील संबंधित उद्योजकाचे नाव एपी असल्याचे समजते. तो अभिनयासोबत दुबईत स्वत:च्या कार बिझनेससाठी प्रसिद्ध आहे. क्रिस्टल ही टीव्हीवरील प्रख्यात अभिनेत्री आहे, 2007 साली तिने टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिची मालिका ‘एक हजारें में मेरी बहना है“ गाजली होती. काही चित्रपटांमध्येही ती दिसून आली आहे. ‘धुरंधर“ चित्रपटात क्रिस्टलने एक आयटम साँग ‘शरारत“ केले होते, या गाण्यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.