‘डॉन 3’ चित्रपटात क्रीतिची वर्णी
रणवीर सिंह आणि फरहान अख्तरचा चित्रपट ‘डॉन 3’ स्वत:च्या घोषणेपासूनच अत्यंत चर्चेत आहे. कियारा अडवाण यापूर्वी या अॅक्शन थ्रिलरपटात मुख्य भूमिका साकारणार होती. परंतु गरोदरपणामुळे तिला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले आहे. आता तिच्या जागी क्रीति सेनॉनची वर्णी लागल्याचे समजते. अलिकडेच पापाराझ्झींनी क्रीतिला ‘लेडी डॉन’ असे संबोधिल्यावर ती चकित झाली.
क्रीति सेनॉनने रणवीर सिंहसोबत ‘डॉन 3’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास सहमती दर्शविली आहे. या चित्रपटाच्या करारावर ती लवकरच स्वाक्षरी करणार आहे. फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेन्मेंटच्या क्रिएटिव्ह टीमला ‘डॉन 3’मध्ये उत्तम स्क्रीन प्रेजेंस असलेल्या अनुभवी अभिनेत्रीची गरज होती. क्रीति सेनॉन या भूमिकेसाठी अत्यंत योग्य असल्याचे टीमचे मानणे होते.
क्रीति सेनॉनने मे महिन्यात फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेन्मेंटच्या कार्यालयात जात चर्चा केली होती. याचमुळे ती ‘डॉन 3’ या चित्रपटात दिसून येणार असल्याची पुष्टी मिळाली होती. क्रीतिने परंतु यासंबंधी अद्याप कुठलीच घोषणा केलेली नाही. क्रीति करारावर स्वाक्षरी केल्यावर चित्रपटासंबंधी स्वत:च्या तयारीला सुरुवात करणार आहे.