‘तेरे इश्क में’मध्ये क्रीतिची एंट्री
‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ यासारखे चांगले चित्रपट देणारे दिग्दर्शक आनंद एल. राय आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांची जोडी पुन्हा एकदा ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाद्वारे जमणार आहे. या चित्रपटाचा टीझर अन् प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या टीझरमध्ये धनुषची झलक दिसून येते. तसेच यात अभिनेत्री क्रीति सेनॉन देखील दिसून येत आहे. आनंद एल. राय यांच्या या चित्रपटात आता धनुष आणि क्रीति ही नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात एक रोमँटिक लव्ह स्टोरी थ्रिलर असणार आहे. मोठ्या पडद्यावर प्रेमकहाण्या मांडण्याचे कौशल्य आनंद एल. राय यांना चांगलेच अवगत आहे. रांझणा सारखा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. नव्या चित्रपटात क्रीति सेनॉन ही मुक्ती तर धनुष हा शंकर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. धनुष अन् क्रितिचा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे.