क्रीतिचा कॅलरी-डिफिसिट डायट चर्चेत
कॉकटेल 2 चित्रपटासाठी चोखाळला मार्ग
शाहिद कपूर, क्रीति सेनॉन आणि रश्मिका मंदाना हे लवकरच कॉकटेल 2 या चित्रपटात दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित ‘कॉकटेल’चा सीक्वेल आहे. कॉकटेल 2 चित्रपटाच्या काही दृश्यांमध्ये क्रीति अत्यंत फीट आणि बोल्ड दिसून येतेय. आता तिने याचवरून स्वत:चा डायट आणि रुटिनवरून माहिती दिली आहे.
कॉकटेल 2 च्या दरम्यान मी अत्यंत स्ट्रिक्ट डायट आणि कंसिस्टेंट वर्कआउट रुटीनवर होते आणि पहिल्यांदाच मी कॅलरी-डिफिसिट डायट फॉलो केला आहे. मी यापूर्वी कधीच आयुष्यात हे केले नव्हते. आम्ही इटलीच्या सिसिलीमध्ये चित्रिकरण करत होतो आणि तेथे आहारात प्रामुख्याने पिझ्झा, पास्ताचा सामवेश असतो, अशास्थितीत मी ते टाळले आहे, असे क्रीति सांगते.
कॉकटेल 2 हा चित्रपट अत्यंत योग्यवेळी प्रदर्शित होणार आहे. मी एक यंग, अर्बन आणि मजेशीर रोम-कॉम स्पेसमध्ये जाऊ इच्छित होते. हा एक सीक्वेल आहे, परंतु माझ्या दृष्टीने हा एक वाइब सीक्वेल आहे. याची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे, व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्याची पार्श्वभूमही वेगळी असल्याचे क्रीतिचे सांगणे आहे. कॉकटेल 2 हा चित्रपट 19 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे.