For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौरव कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये कृतिका

06:31 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
गौरव कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये कृतिका
Advertisement

अभिनेत्री कृतिका कामरा मागील काही काळापासून स्वत:च्या खासगी आयुष्यावरून चर्चेत आहे. कृतिकाने आता स्वत:चे रिलेशनशिप उघड केले आहे. कृतिका ही टीव्ही प्रेझेंटर गौरव कपूरला डेट करत आहे. कृतिकाने काही छायाचित्रे शेअर करत गौरव कपूरसोबतच्या रिलेशनशिपची माहिती दिली आहे.

Advertisement

गौरव कपूर हा टीव्ही प्रेझेंटर असण्यासोबत अभिनेता देखली आहे. तो आयपीएलचे प्रीमॅच शो, टी-20 सामन्यांचे कव्हरेज आणि स्वत:चा लोकप्रिय युट्यूब शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’साठी ओळखला जातो. गौरवने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात एफएफम रेडिओद्वारे केली होती. त्यानंतर तो चॅनेल व्हीवर वीजे झाला होता. गौरवने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2003 साली त्याने ‘डरना मना है’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर तो राम गोपाल वर्मा की आग, अगली और पगली, ए वेन्सडे, क्विक गन मुरुगन, चला मुसद्दी ऑफिस ऑफिस आणि काय पो छे यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला होता.

गौरवने अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलसोबत विवाह केला होता. परंतु दोघेही आता विभक्त झाले आहेत. गौरवच्या आयुष्यात आता कृतिकाची एंट्री झाली आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. कृतिकाचे नाव यापूर्वी अभिनेता करण कुंद्रासोबत जोडले गेले होते. दोघांनी काही वर्षांपर्यंत परस्परांना डेट केले होते आणि त्यानंतर ब्रेकअप झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.