वरुणसोबत पुन्हा झळकणार क्रीति
विनोदी धाटणीच्या चित्रपटात एंट्री
एखादा अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडी यशस्वी ठरली तर निर्माते ती पुन्हा जमविण्याचा प्रयत्न वारंवार करतात. अभिनेत्री क्रीति सेनॉन आणि अभिनेता वरुण धवनसोबत देखील असेच घडत आहे. क्रीति आणि वरुण यांची जोडी यापूर्वी ‘दिलवाले’ आणि ‘भेडिया’ चित्रपटात दिसून आली आहे. आता त्यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. क्रीति ही वरुणचा आगामी चित्रपट ‘है जवानी तो इश्क होना है’मध्ये दिसून येणार आहे.
या चित्रपटासाठी वरुण आणि क्रीतिने अलिकडेच मुंबईत एका डान्स नंबर गीताचे चित्रिकरण केले आहे. परंतु हे गीत चित्रपटाच्या कहाणीचा हिस्सा नाही. हे गीत चित्रपट संपल्यावर क्रेडिट सीनदरम्यान दाखविले जाणार आहे. या गाण्यात वरुण आणि क्रीतिसोबत अभिनेता मनीष पॉलही असेल. हा चित्रपट 22 मे रोजी प्रदर्शित होणर आहे.
क्रीति सध्या स्वत:चा आगामी चित्रपट कॉकटेलच्या तयारीत आहे. चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना दिसून येईल. हा चित्रपट 19 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच ती दोन तेलगू चित्रपट, नो एंट्री 2 आणि भेडिया 2 या चित्रपटांमध्येही काम करत आहे. तर वरुण हा भेडिया 2, नो एंट्री 2 चित्रपटातही काम करत आहे.