कृति सेनन साकारणार नवी हॉरर फिल्म
बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन पुन्हा एकदा हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्मयता आहे. ‘भेडिया’नंतर कृति सेनन आणि मॅडॉक फिल्म्स यांची जोडी एका नव्या चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट हॉरर-कॉमेडी नसून पूर्णपणे भयपट असणार असल्याचे वृत्त आहे. मॅडॉक फिल्म्सने ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘मुंज्या’ यांसारख्या चित्रपटांद्वारे हॉरर-कॉमेडी प्रकारात लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, नव्या चित्रपटात विनोदाऐवजी भीतीवर अधिक भर दिला जाण्याची शक्मयता आहे. कृति सेननसाठी हा मॅडॉक फिल्म्ससोबतचा नववा चित्रपट, तर ‘मिमी’नंतर प्रमुख भूमिकेतील दुसरा स्वतंत्र चित्रपट ठरू शकतो. कृति सेननला ‘मिमी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. नव्या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार, कथानक आणि चित्रीकरणाचे वेळापत्रक याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच निर्मात्यांकडून चित्रपटाची अधिकृत घोषणाही झालेली नसल्याने या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
