क्रिती सेनन नऊ वर्षांनी लहान बिझनेसमनसोबत करणार लग्न ?
मुंबई
बॉलीवूडची अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिचा बॉयफ्रेण्ड कबीर बहिया यांच्या विषयावरून चर्चेच आहे. क्रिती सध्या बिझनेसमन कबीर बहिया डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. दोघांच्या नात्याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या क्रितीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कबीर बहियाच्या कुटुंबियांबरोबर क्लॉलिटी टाईम घालवताना दिसत आहे. दुबईमध्ये एक लग्न समारंभातला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओनंतर क्रिती आणि कबीर यांच्या लग्नाबद्दलही जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोघे पुढच्यावर्षी लग्न करू शकतात असेही म्हणले जात आहे.
एवढचं नाही तर एका फोटोमध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्न साक्षी यांच्या सोबत क्रिती गप्पा मारताना दिसत आहे. कबीर बहिया हा साक्षीचा चुलत भाऊ आहे, अशी ही सर्वत्र चर्चा आहे. कबीर हा भारतीय क्रिकेट च्या खेळांडूंसोबत अनेक वेळा दिसला आहे.