For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया’मध्ये क्रीति

06:33 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
तेरी बातों में ऐसा उलझा जिया’मध्ये क्रीति
Advertisement

बॉलिवूडमध्ये निर्माते सध्या नव्या जोड्यांवर भर देत आहेत. याचनुसार शाहिद कपूर आणि क्रीति सेनॉनची लवकरच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. या दोघांच्या चित्रपटाचे एक नवे पोस्टर निर्मात्यांनी जारी केले आहे. याचबरोबर या चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात आले आहे. शाहिद-क्रीतिच्या या चित्रपटाचे नाव ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ आहे.

Advertisement

शाहिद आणि क्रीति एका प्रेमकहाणीसोबत मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 9 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी झळकणार आहे. शाहिद आणि क्रीति हे बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय कलाकार आहेत. दोघेही पहिल्यांदाच एखाद्या ‘रॉम-कॉम’मध्ये एकत्र दिसून येणार आहे.

क्रीतिने सोशल मीडियावर एका कॅप्शनसोबत चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘या व्हॅलेंटाइन सप्ताहात एका अशक्य प्रेमकहाणीचा अनुभव घ्या. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय’ असे क्रीतिने नमूद केले आहे. या चित्रपटात शाहिद वैज्ञानिकाच्या भूमिकेत आहे. हा वैज्ञानिक एका रोबोटच्या प्रेमात पडत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. चित्रपटात क्रीति सेनॉन एका रोबोटची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कहाणी अमित जोशी आणि आराधना साह यांनी लिहिली असून त्यांची दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.