For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णात खोत हे साहित्य क्षेत्राला मिळालेले नवे रत्न : माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

03:29 PM Feb 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
कृष्णात खोत हे साहित्य क्षेत्राला मिळालेले नवे रत्न   माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार
Krishnat Khot
Advertisement

सरुड येथे कृष्णात खोत यांचा नागरी सत्कार

सरुड / वार्ताहर

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत हे शिक्षणातून साहित्य क्षेत्राला मिळालेले एक नवे रत्न आहे असे गौरवोद्गार माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरुडकर यांनी केले. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक व रिगांणकार कृष्णात खोत यांचा सरुड येथे ग्रामस्थ , विविध संस्था व श्री शिवशाहू महविद्यालय यांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला . या सत्कार समारंभात ते बोलत होते . यावेळी माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर हे प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

माजी आमदार बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले शिक्षणामुळे ग्रामीण भागातील मुलं शिक्षीत झाली यातील अनेकांनी आपल्या लेखनीव्दारे ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या , दुःख यांना आपल्या साहित्यातुन वाचा फोडली . साहित्यिक कृष्णात खोत यांनीही मोठ्या तळमळीने आपल्या सर्व साहित्यातुन अशाच समस्यांवर प्रकाशझोत टाकत ग्रामीण भागाचे व तेथील जनतेचे वास्तववादी चित्रण समाजापुढे आणण्याचे काम केले आहे . त्यांचे हे साहित्य समाजासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल.

माजी आमदार सत्यजीत पाटील म्हणाले , कृष्णात खोत यांच्यासारख्या दुर्गम व डोंगरी भागातील लेखकाचा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने संपुर्ण देशात होत असलेला गौरव हा आमच्यासह शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील जनतेसाठी अभिमानास्पद आहे .
सत्काराला उत्तर देताना रिगांणकार कृष्णात खोत म्हणाले , बदलत्या शिक्षण व्यवस्थेमुळे ज्ञानाची परिभाषा बदलली जाऊ लागली आहे . यातुन ज्ञाना पेक्षा श्रीमंतीचे व पैशाचे प्रदर्शन सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे . सध्या गावोगावी शिक्षण महर्षिंचे पेव फुटले आहे . सध्याचे शिक्षण स्वतः भोवतीच फिरत आहे . शिक्षण क्षेत्रातील अवाजवी प्रयोगांमुळे शिक्षणाचेच वाटोळे करून ठेवले आहे . यामध्ये परिवर्तन होऊन शिक्षणाचा मांडलेला हा बाजार मोडुन काढला पाहीजे . सामान्य माणसाला आवाज देण्याचे काम लेखक आपल्या साहित्यातुन करत असतो . त्यामुळे थोर महापुरुषांची पुस्तके आपण वाचली पाहिजेत . व स्वकर्तृत्वातून आपली ओळख आपण स्वतःच निर्माण केली पाहिजे .

Advertisement

यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते साहित्यिक कृष्णात खोत यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच भगवान नांगरे , उपसरपंच सुनिता रोडे - पाटील हनुमान सेवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णत पाटील , सरुड नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष कुराडे , दत्त दुध संस्थेचे अध्यक्ष नाथा नांगरे , निवासराव थोरात , प्राचार्य डॉ . एच . टी . दिंडे , मुख्याध्यापक जी . एस . पाटील, ग्रामीण साहित्यिक अशोक कोकाटे यांच्यासह सर्व ग्रा . प . सदस्य , विविध संस्थाचे पदाधिकारी , ग्रामस्थ 'श्री शिव शाहू महाविधालयातील सर्व प्राध्यापक , विद्यार्थी , विधार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक प्रा . प्रकाश नाईक यांनी तर सुत्रसंचालन प्रा . डॉ . डी . आर . पाटील यांनी केले . आभार प्रा . डॉ . पी . बी . पाटील यांनी मानले .

Advertisement
Tags :

.