For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : भक्तीमय वातावरणात 'कृष्णामाई' यात्रोत्सवाची सांगता

04:48 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   भक्तीमय वातावरणात  कृष्णामाई  यात्रोत्सवाची सांगता
Advertisement

                             कृष्णामाई यात्रोत्सवात हजारो भाविकांचा सहभाग

Advertisement

सांगली : सांगलीत २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान भक्ती, संस्कृती व पर्यावरण जागृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शहराची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णामाई नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'आपली आई कृष्णामाई' या संकल्पनेतून भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दि. २७जानेवारी रोजी ध्वजपूजनाने उत्सवाची सुरुवात झाली. कृष्णामाई मंदिर, सरकारी घाट, माई घाट व विशाल घाट परिसरात विविध उपक्रम राबवले गेले.

यात्रोत्सवाची सांगता १ फेब्रुवारी रोजी झाली. सकाळी ६ वाजता शाहीस्नान, त्यानंतर कृष्णामाई मंदिरातील पूजा व रामेश्वर मंदिर कलशाभिषेक व बित्वार्चन झाले. सकाळी १० वाजता 'नदी संवाद'
कार्यक्रम पार पडला.

Advertisement

सायंकाळी ४ वाजता श्री स्वामी समर्थ (दासबोध) सेवा केंद्र,सांगली यांचे भजन झाले. त्यानंतर कृष्णामाई पुरस्कार वितरण सोहळा व कृष्णामाई धनगरी ओवी सेवा कार्यक्रम झाला. यावेळी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी विश्वविक्रमी श्री मुरलीधर बाळू ओवीकार मंडळ, कुपवाड यांचा सहभाग होता. शेवटच्या सत्रात कुष्णामाई गंगामाई महाआरती व कृष्णामाईला साडी नेसवणे सोहळा संपन्न झाला. रात्री महाप्रसादाने यात्रोत्सवाची सांगता झाली.

या यात्रोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती, सामाजिक एकोपा व पर्यावरण जागूती यांचा समन्वय साधण्यात आला. आठवडाभर धार्मिक कार्यक्रमांसह नदी स्वच्छता, रक्तदान, जनजागृती व विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. सांगली संस्थानच्या सहकार्याने महेंद चंडाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजन केले. सांगलीसह परिसरातील भाविकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Advertisement
Tags :

.