For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : कृष्णा कारखाना निवडणुकीतून आणखी चौघांची माघार

04:25 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news    कृष्णा कारखाना निवडणुकीतून आणखी चौघांची माघार
Advertisement

कराड : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत बुधवारी चार गटांतील प्रत्येकी एका उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील  उमेदवारांची संख्या ११२ वर आली आहे.

Advertisement

निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेर्ले-तांबवे व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक ३ मधून भगवान निवृत्ती चव्हाण (रा. नेर्ले), येडेमच्छिंद्र-वांगी व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक ५ मधून प्रतापराव शिवाजीराव पाटील (रा. येडेमच्छिंद्र), अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती राखीवमधून विजय तातोबा गायकवाड (रा. शेणोली) व विमुक्त जाती,

भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गमधून वसंत दादू पावणे (रा. कालवडे) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उमेदवारांची संख्या ११२ वर आली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवार ९ जून ही अंतिम मुदत असून अजून सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.