महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्णा आज इशारा पातळी ओलांडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

12:12 PM Aug 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sangli Flood Krishna- Varana
Advertisement

कोयनेचा विसर्ग स्थिर, सातारा जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग दुप्पटीने वाढवला

सांगली प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना, वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोयना वगळता सातारा जिल्ह्dयातील अन्य धरणांतील विसर्ग दुप्पट, तिप्पटीने वाढवला आहे. त्यामुळे सांगलीत पाणीपातळी पुन्हा वाढू लागली असून आज कृष्णा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement

मंगळवारी कृष्णा नदीची पाणीपातळी उतरत असतानाच बुधवारी तारळी, धोम कन्हेर धरणातील विसर्ग वाढवले आहेत. धरणांच्या पाणलोट आणि मुक्त क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जादा पाऊस सुरू झाल्याने प्रशासनाचे अंदाज मागे पडले आहेत. त्यामुळे कराडपासून ताकारीपर्यंत कृष्णा नदीच्या पातळीत तीन ते चार फुटांनी वाढ झाली आहे. कराडच्या कृष्णा पुलाजवळील विसर्ग 44 हजार 700 क्युसेक वरून 83 हजारपर्यंत वाढला आहे.

Advertisement

मंगळवारपासून कोयना धरणाचा विसर्ग 42100 क्युसेकवर स्थिर आहे. कोयनासह अन्य धरणातून पाण्याचा ा†वसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये दिवसभरात अर्धा फुटापर्यंत पाणी वाढले आहे. आज 41 फुटापर्यत पाणी जाण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी आले आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

मगरमच्छ कॉलनीत अन्न पाकीटे वाटप
सध्या सांगलीकरांची पूरस्थिती टळली असली तरीही भारतीय सेनादलाची तुकडी डोळ्यात तेल घालत कार्यरत आहे. 100 जवानांची सैन्य दलाची तुकडी आपल्या कर्तव्यापासून तसभूरही मागे हटले नाही. याचा अनुभव पूरपट्टयातील नागरिकांना येत आहे.

सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनीतील राहिवाशांना पुराच्या पाण्यामुळे बाहेर जाता येत नव्हते. अशा स्थितीत सैन्यदलाच्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना जेवणाचे तसेच जेवण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची पाकिटे वितरित केली .तसेच सैन्यदलाच्या वैद्यकीय चमुने त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. नागरिकांतून जवानांचे आभार मानण्यात आले.

- कृष्णा नदीकाठी पाणी पातळी कमी होऊ लागली आहे
- कालची आणि आजची कमी झालेली पातळी अशी
- 1) कृष्णा पूल कराड- काल 21.3 आज 30.01
- 2) बहे पूल- काल 10’8 आज 13.06
- 3) ताकारी पूल काल 39’3 आज 42
- 4)ा†भलवडी पूल काल 39’06 आज 39.10
- 5)आयर्विन- काल 38.6 आज 38.5
- 6)राजापूर बंधारा-काल 53.5 आज 53.02
राजाराम बंधारा-काल 44.4 आज 42.11

धरण पाणीसाठा (टीएमसी/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
-- 1) कोयनाधरण- काल 80.33 विसर्ग 42100 आज 85.97 विसर्ग 42100
- - 2)वारणा धरण- काल 22.25 टीएमसी विसर्ग 8092 क्युसेक आज 29.60 विसर्ग 11585
-- 3) अलमट्टी धरण- काल 67.86 आज 67.66
- अलमट्टी मध्ये पाणी आवक
- काल 302573 आज 323259
जावक/ विसर्ग
काल 350000 आजही 3,50000
सोर्स - कोयना, वारणा, अलमट्टी, जलसंपदा प्रशासन
कृष्णा वारणा खोऱ्यातील धरणांचा साठा आणि विसर्ग पुढीलप्रमाणे
धरण टक्के विसर्ग (क्युसेक्समध्ये)
कोयना 82 42100
धोम 85 3822
कन्हेर 79 7367
उरमोडी 79 1629
तारळी 88 6446
वारणा 86 11585

Advertisement
Tags :
Krishna crosslevel vigilanceriverside villages
Next Article