महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

क्रेसिकोव्हा पहिल्यांदाच अंतिम फेरीत

06:55 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : रायबाकिनाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

बार्बोरा क्रेसिकोव्हाने एका सेटची पिछाडी भरून काढत कझाकच्या इलेना रायबाकिनाचा पराभव करून विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. जस्मिन पाओलिनीशी तिची शनिवारी जेतेपदासाठी लढत होईल. 31 व्या मानांकित क्रेसिकोव्हाने चौथ्या मानांकित रायबाकिनावर 3-6, 6-3, 6-4 अशी मात केली. विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी झालेल्या अन्य एका उपांत्य सामन्यात जस्मिन पाओलिनीने डोना व्हेकिकचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली होती. क्रेसिकोव्हा-पाओलिनी यांच्यात जेतेदासाठी चुरस असेल. दोघींनीही पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

क्रेसिकोव्हाला गेल्या महिन्यात झालेल्या प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. पण ती निराशा बाजूला सारत तिने येथील स्पर्धेत निर्धारी खेळाच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. रायबाकिनानने जोरदार सुरुवात करताना पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. अचूक सर्व्हिस करीत तिने या सेटमध्ये 4-0 अशी झटपट आघाडी घेतली. क्रेसिकोव्हाने एक गेम घेत तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण रायबाकिनाने 5-1 अशी बढत घेत सेट जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. रायबाकिनाच्या चुकांचा लाभ घेत क्रेसिकोव्हाने आणखी दोन गेम घेतले, पण रायबाकिनाने हा सेट जिंकून आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र क्रेसिकोव्हाने बाजू पलटवली आणि हा सेट 6-3 असा घेत बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्येही क्रेसिकोव्हाने हा जोम कायम राखला. पण यावेळी रायबाकिनानेही प्रतिकार केला. तिने 3-2 अशी बढत मिळविली. पण क्रेसिकोव्हाने झुंजार खेळ करीत नंतर 5-3 अशी आघाडी घेतली आणि आपल्या सर्व्हिसवर गेमसह सामना संपवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article