केआर शेट्टी- टिळकवाडी अकादमी अंतिम फेरीत
बेळगाव : तनिष्क स्पोर्ट्स क्लब आयोजित तनिष्क चषक वरिष्ठांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून ठळकवाडी क्रिकेट संघटनेने युनायटेड क्रिकेट क्लबचा 5 गड्यांनी तर केआर शेट्टी किंग्सने एसकेई क्रिकेट अकादमीचा 4 गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. रोहित दोड्डवाड, संतांष सुळगे- पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटीनियम ज्युबिली मैदानवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युनायटेड क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 22.3 षटकात सर्व गडी बाद 110 धावा केल्या.
वासीम होनगेकरने 1 षटकार व 6 चौकारांसह 46 तर गौसपीर हाजिने 3 चौकारांसह 31 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे रोहित दोड्डवाडने 8 धावात 4, ओमकार चव्हाणने 3 धावात 2 गडी बाद केले. प्रत्त्युतरा दाखल खेळताना टिळकवाडी क्रिकेट अकादमीने 12.4 षटकात 5 गडी बाद 111 धावा करुन सामना 5 गड्यानी जिंकला. रोहित दोड्डवाडने 2 षटकार 5 चौकारासह 40, शिवम यादवने 2 षटकार 2 चौकारासह 24 तर रवी पिल्लेने 20 धावा केल्या. युनायटेडतर्फे गौसपीर हाजिने 33 धावात 3 तर मोसीन खानने 19 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसकेई अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 179 धावा केल्या. संतोष जाधवने 1 षटकार, 7 चौकारासह 49, अशोक सिंगने 1 षटकार 2 चौकारासह 35 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे संतोष सुळगे-पाटीलने 18 धावात 4, अक्षय जगताप व नासिर पठाण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केआर शेट्टी संघाने 22. 3 षटकात 6 गडी बाद 180 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. गुरुप्रसादने 1 षटकार 4 चौकारासह 74, सद्दाम होसकोटीने 1 षटकार 3 चौकारसह 30, मोहम्मद हाजीने 40 धावा 3 तर अक्षयने 1 गडी बाद केला.