महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केआर शेट्टी लायाज, एमसीसी अकादमी विजयी

09:44 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित धारवाड विभागीय केएससीए फोर्थ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केआर. शेट्टी लायाज संघाने गोकाक क्रिकेट क्लबचा तर एमसीसी अकादमीने एस. आर. टायटनचा पराभव करून प्रत्येकी 4  गुण मिळवले. गुरुप्रसाद पोतदार (केआर शेट्टी) गौसपीर हाजी (एमसीसी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ऑटोनगर बेळगाव येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात के आर शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 27 षटकात सर्व गडीबाद 202 धावा जमवल्या. त्यात सलामीवीर गुरुप्रसाद पोतदारने 2 षटकार 12 चौकारांसह 100 धावा करून शतक झळकविले. त्याला अनुराग वाजपेयीने 2 षटकार 5 चौकारांसह 44, प्रशांत लायंदरने 3 चौकारांसह 24 धावा करून सुरेख साथ दिली. गोकाक क्रिकेट क्लबतर्फे अफजल पत्तारने 2, आनंद व उजेफा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाक क्रिकेट क्लब  संघाचा डाव 24.5 षटकात सर्व गडी बाद 173 धावात आटोपला. त्यात अफजल पत्तारने 6 चौकारासह 45, हुजिफा बागीने 2 चौकारासह 36, शुभम चौधरीने 24, प्रीतमने 12 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे अनंत माळवीने 36 धावात 4, रब्बानी दफेदारने 30 धावांत 3, किरण तारळेकर, मिलिंद बेळगावकर, अनुराग बाजपेयी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दुपारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात एस. आर. टायटन संघाने प्रथम फलंदाजी करताना 18.2 षटकात सर्व गडी बाद 68 धावा केल्या. त्यात इम्रान नाईकवाडीने 25, किशोर लोहारने 11 धावा केल्या. एमसीसीतर्फे गौसपिर हाजीने 19 धावात 4, सुजितराज, ताहीर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी अकादमीने 12.1 षटकात 2 गडी बाद 62 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात मलिक मुल्लाने 5 चौकारांसह 32, अनुरागने एक षटकार एक चौकारांसह 23, तर दादापीर हाजीने 11 धावा केल्या. एस आर टायटन तर्फे शिवा व राजू यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article