KP Patil Kolhapur : 'त्यांच्याकडून दुसरीकडे गेलो, ते त्यांच्या सूचनेनुसारच', भरसभेत केपी पाटलांचा गौप्यस्फोट
नेहमीच माझी जनता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिल
कोल्हापूर : राजकारणात उद्याच्या काळातही अनेक अडचणी येतील सर्वांवर मात करायची आहे. भविष्यात महायुतीचं काय होणार माहिती नाही. त्यामुळे आपण स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी जिद्दीनं, ताकदीनं निवडणूकीत उतरण्याची गरज आहे.
दुसरीकडे विधानसभा लढवली याचा अर्थ तिकडे माझ्या इच्छेन गेलो असे नाही तर त्यांच्या सूचनेनुसारच गेलो. त्यामुळे मी माझे कार्यकर्ते त्यांच्या आदेशाबाहेर नाही. नेहमीच माझी जनता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिल, असा गौप्यस्फोट केपी पाटील यांनी केला.
पुढे ते म्हणाले, बडे नेते आदेश देतील त्यानुसार पुढे जाऊयात. नेत्यांच्या आदेशाच्या बाहेर जायचं नाही. दुसऱ्या पक्षात जाऊन विधानसभा लढवली, म्हणजे त्यांना सोडून गेलो असे नाही. त्यांच्या सूचनेनुसारच मी गेलो. माझी जनता, कार्यकर्ते हे सर्व मुश्रीफ यांच्यासोबतच होते आणि कायम राहतील. एकदा निवडणूक लढवली की लोक घाईला येतात. परंतु सहा वेळा निवडणूक लढवली ही माझी ताकद आहे.
सरासरी 90 हजारांची मते मला आहेत. त्यामुळे आजही ती राधानगरी, भुदरगड आणि आजाऱ्यात अव्याहतपणे आहे. इथून पुढे याला ताकद, शक्ती देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. असाच काळ होता तीस वर्षांपूर्वी भाजपचे देशात केवळ दोन खासदार होते. आता सगळा देश त्यांनी व्यापलाय. त्यामुळे घाबरायचं नाही. आपले नेते अजित पवार कतृत्वावान असून त्यांना हसन मुश्रीफांची जोड आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.