Satara News : 'त्या' घरात आक्रोश अन् फक्त आक्रोश !
06:24 PM Jun 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
दोन भावंडांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गाढखोप गाव सुन्न, सर्वत्र शोककळा
Advertisement
कोयनानगर: शुक्रवार ५ मे रोजी कोयना विभागातील गाढखोप गावातील आर्यन कदम व करण कदम या दोन शाळकरी भावंडांचा कोयना नदीपात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलांच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जाणारे नातेवाईक, मित्रमंडळी तिथले हृदयद्रावक दृश्य पाहून, तेथील आक्रोश ऐकून सुन्न होत होते.
नियतीच्या मनात काय होत कोण जाणे; पण ही घटना कल्पनेपलीकडची दुर्दैवी घटना आहे. असले दुःख कोणत्याच कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये. मुलांच्या जन्मापासून पालकांच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणाला आई-वडील माझा मुलगा, माझी मुलगी आणि त्याचं भावी आयुष्य यांच्या आर्यन कदम करण कदम व्यतिरिक्त काही बोलत नाहीत. त्यामुळे मुले लहान असोत की मोठी, प्रत्येक मुलाने आपल्या कुटुंबाला धोका पोहोचणार नाही,
कुटुंबाला दुःख पोहचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. शनिवारी सकाळी त्या दुर्दैवी मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्नीचा विधी संपल्यावर मृत चिमुकल्यांच्या आई-वडिलांच्या भेटीला अनेक नातेवाईक, मित्रमंडळी व परिसरातील लोक जात होते.
त्यावेळी आई-वडील, आजी आणि कुटुंबातील सदस्य यांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. क्षणात उभे असलेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खूप वेदनादायी परिस्थिती पाहायला मिळत होती. त्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना मोलमजुरी करून लहानाचे मोठे केले. मुले मोठी झाली की आपले कष्ट कमी होतील अशी त्यांची अपेक्षा होती;
मात्र क्षणात होत्याचे नव्हते झाले. मुले आज दिसत नव्हती. ऐकायला मिळत होता तो फक्त आक्रोश आणि पाहायला मिळत होता तो या घटनेने सुन्न झालेला गाव. एकाच कुटुंबातील एकाच घरातील दोन तरुण मुलांचा दुर्दैवी अंत होणे ही घटनाचं दुर्दैवी आहे.
मात्र अशा प्रकारच्या घटना टाळायच्या असतील तर आजच्या पिढीने आपले संस्कार न विसरता, सोशल मीडियाच्या आहारी न जाता आपल्या आई-वडिलांचा विचार करणे गरजेचे आहे.
Advertisement