For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Koyna Dam | कोयना धरण ९५.४७ टक्के भरले; पाणीसाठ्याने शंभरी ओलांडली!

01:54 PM Aug 25, 2026 IST | NEETA POTDAR
koyna dam   कोयना धरण ९५ ४७ टक्के भरले  पाणीसाठ्याने शंभरी ओलांडली
Advertisement

कोयनानगरः महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असणारे कोयना धरण ९५.४७ टक्के भरले असुन धरणातील पाणीसाठा १००. ४९ टीएमसी झाला आहे. कोयना धरणातील पाणी साठ्याने शंभर टीएमसीचा टप्पा पार केला असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यांची पाण्याची व बीजेची चिंता मिटली आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात थांबून थांबून श्रावण सरी पडत असून पाऊस घटल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरात होणारी पाण्याची आवकही घटली आहे. तरी सुद्धा धरण पारिसरात पडलेल्या पावसामुळे अखेर कोयना धरण ९५.४७टक्के भरले असून धरणातीलपाणी साठ्याने शंभरी पार केली

Advertisement

असून पाणीसाठा सोमवारी सायंकाळीपाच वाजता १००. ४९ टीएमसीझाला आहे. कोयना धरणातील पाणी साठ्याने शतक पूर्ण केले असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील जनतेची पाणी आणि बीजेची चिंता आता मिटली आहे. कोयनेतील पाणी साठ्याने शंभर टीएमसीचा टप्पा पार केल्यामुळे या वर्षी धरण भरतेय की नाही, पाऊस कमी आहे. बीजेचे पाण्याचे संकट यावेळी सर्वांच्या समोर उभे राहणार अशी शंका व्यक्त करणारांना दिलासा मिळाला आहे.
राज्यांची पाणी आणि वीजेची चिंता मिटली.

कोयनेत एकूण १००.४९ टीएमसी पाणीसाठा...

Advertisement

धरण ९५.४७ टक्के भरले असल्याने पूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी फक्त पाच टक्के पाणी साठ्याची आवश्यकता आहे.सोमवारी सायंकाळी कोयना जल सागरात तीन हजार ३९५ क्युसेका पाण्याची आवक होत असुन पाणी साठा १००. ४९ टीएमसी व पाण्याची पातळी २१५९फुट १० इंच झाली आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे २४ मिलिमिटर व एकूण ३९१२ मिलिमिटर तसेच नवजा येथे ३५ मिलिमिटर व एकूण ४९८६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.