माद्रीद स्पर्धेत कोस्ट्युक विजेती
06:13 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, माद्रीद (स्पेन)
Advertisement
रविवारी येथे झालेल्या माद्रीद खुल्या मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेत युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युकने महिला एकेरीचे जेतेपद पटकाविताना रशियाच्या मीरा अँड्रीव्हाचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कोस्ट्युकने अँड्रीव्हाचे आव्हान 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. हा अंतिम सामना 80 मिनिटे चालला होता. कोस्ट्युकचे डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील हे एकेरीचे तिसरे विजेतेपद आहे. 2023 साली कोस्ट्युकने ऑस्टीनमधील स्पर्धा तर गेल्या महिन्यात रोएन येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
Advertisement
Advertisement