For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेल्फी घेताना दुधगंगा नदीत कोरोची येथील युवक वाहून गेला, शोधकार्य सुरू

04:59 PM May 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
सेल्फी घेताना दुधगंगा नदीत कोरोची येथील युवक वाहून गेला  शोधकार्य सुरू
Dudhganga river
Advertisement

राधानगरी/प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील काळामावाडी येथे धरण पाहण्यासाठी आलेल्या कोरोचीमाळ ता, हातकणंगले येथील युवकाचा दुधगंगा नदीच्या काठावर सेल्फी घेत असताना पाय घसरून वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.

Advertisement

या बाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजी जवळ असणाऱ्या कोरोची गावातील युवक उज्वल कमलेश गिरी वय वर्ष 21मूळ गाव बिहार हा आपल्या मित्रांसमवेत काळामावाडी धरण पाहण्यासाठी आला असताना नदीच्या पाण्यामध्ये गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने उज्वल या तरुणाचा पाय घसरून पडल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे अद्याप सापडला नसून त्याचे मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीम काळमावाडी धरणाच्या नदी काठावर दाखल झाली असून अद्याप शोध चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.