For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Education News | कोरेगावच्या कन्येची उत्तुंग भरारी! केंद्रप्रमुख परीक्षेत रूपाली विरकर राज्य गुणवत्ता यादीत

05:18 PM Mar 16, 2026 IST | NEETA POTDAR
satara education news    कोरेगावच्या कन्येची उत्तुंग भरारी  केंद्रप्रमुख परीक्षेत रूपाली विरकर राज्य गुणवत्ता यादीत
Advertisement

                                   कोरेगाव तालुक्यातील शिक्षिकेचे यश

Advertisement

कोरेगाव - राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत 36 व जिल्हा गुणवत्ता यादीत ३ रा क्रमांक पटकावला आहे. सध्या त्या कराड तालुक्यात जि.प.प्राथ शाळा वनवासमाची नवी या ठिकाणी कार्यरत आहेत.

त्यांचे मूळ गाव नांदगिरी ता . कोरेगाव जि. सातारा असूनप्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदगिरी येथील जि.प.प्राथ शाळेतून व नांदगिरी हायस्कूल नांदगिरी येथून पूर्ण केले. विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर डी. एड. करून प्राथमिक शिक्षक म्हणून कराड तालुक्यात २०११ साली सेवारंभ केला.

Advertisement

आईची तीव्र ईच्छा व पती गणेश विरकर यांची खंबीर साथ यामुळे लग्नानंतर सेवेत कार्यरत असतानाच शिक्षणामध्ये खंड पडू न देता सतत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता वाढविण्याचा प्रयत्न केला. मुक्त विद्यापीठातून बी.एड, मास्टर ऑफ एज्यूकेशन यांसारखे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले. नेट व सेट यांसारख्या परीक्षांसाठी शिक्षणशास्त्र विषयातून पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले.

स्व विकासा बरोबरच त्यांनी कार्यरत शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले. त्यातूनच उत्कृष्ट लोकसहभाग, माता पालक उद्बोधन, विद्यार्थी मूल्यवर्धन उपक्रम यात उत्तम योगदान देता आले.
केंद्रप्रमुख परिक्षेसाठी प्रेरणा व मार्गदर्शन या कामी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी जेष्ठ शिक्षक , सर्व विद्यार्थी व नातेवाईक यांचे मोलाचे योगदान आहे. या त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व थरातून व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.