For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : दरमहा पैसे देण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

02:08 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   दरमहा पैसे देण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Advertisement
                                                पाच जणांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एकंबे ;  माझे दुकान चांगले चालत नाही, त्यामुळे तू मला दरमहा पैसे द्यायचे, अशी मागणी करून खंडणीसदृश दबाव टाकल्याचा आरोप करत व्यापाऱ्यावर लोखंडी रॉड, लोखंडी हत्यार, लाकडी दांडके आणि सिमेंटच्या विटेने हल्ला केल्याची घटना कोरेगाव शहरातील चौथाई गल्ली परिसरात घडली. या प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
फिर्यादी आनंद अशोक गोरे (वय ३८, रा. चौथाई गल्ली, महादेव मंदिराजवळ, कोरेगाव) हे फेटे व कापड व्यवसाय करतात. अजित राजेंद्र पवार याने तुझे दुकान माझ्यापेक्षा चांगले चालते, त्यामुळे मला दरमहा पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली.
त्यास गोरे यांनी नकार दिल्यानंतर सर्वांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अतिश संजय पवार याने लोखंडी रॉ डने फिर्यादीच्या नाकावर वार करून जखमी केले. 
संजय नारायण पवार याने लोखंडी हत्याराने डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली. अजित राजेंद्र पवार याने लाकडी दांडक्याने पाठ, उजवा हात आणि उजव्या पायाच्या नडगीवर मारहाण केली. अर्चना संजय पवार हिने सिमेंटची विट पाठीत फेकून मारली,
तर शारदा राजेंद्र पवार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी अतिश पवार, संजय पवार, अजित पवार, शारदा पवार आणि अर्चना पवार (सर्व रा. चौथाई गल्ली, कोरेगाव) यांच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.