कॉमेडी चित्रपटात दिसणार कोंकणा
मिसचीफ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा लवकरच ‘मिसचीफ’ या चित्रपटात दिसून येणार आहे. कोंकणाने या विनोदी चित्रपटात कार्लोस बार्डेमच्या विपरित मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती अनु वैद्यनाथन यांनी केली आहे.
या कॉमेडी चित्रपटाचा हिस्सा असल्याने मला चांगले वाटत आहे. चित्रपटात महिलेची कहाणी असून याच्या लेखनाने मी अत्यंत आनंदी असल्याचे कोंकणाने म्हटले आहे. मिसचीफ चित्रपटात एका आईची कहाणी दाखविण्यात आली आहे जी एक चित्रपट दिग्दर्शिका म्हणून स्वत:चा संघर्ष करत आहे. तिच्या वैवाहिक नात्यात अडचणी असून मुलांची जबाबदारी ती उचलत असल्याचे दाखविले जाणार आहे.
कोंकणा आमच्या चित्रपटाची नायिका रुमीशी साधर्म्य असलेली महिला असल्याचे आमचे मानणे आहे. चित्रपटात कोंकणा आणि कार्लोस यांना सामील करण्याचा माझा निर्णय योग होता असे दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका अनु वैद्यनाथन यांनी म्हटले आहे.
ब्रिटिश चित्रपट निर्माता पीटर वेबर देखील या चित्रपटात कार्यकारी निर्माता म्हणून सामील आहे. त्याने गर्ल विथ ए पर्ल इयरिंग चित्रपटाची निर्मिती केली होती. मिसचीफ या चित्रपटाची निर्मिती अवनी फिल्म्स बॅनर अंतर्गत होत आहे.