For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अक्यूज्ड’मध्ये कोंकणा अन् प्रतिभा

06:05 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘अक्यूज्ड’मध्ये कोंकणा अन् प्रतिभा
Advertisement

27 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार चित्रपट

Advertisement

कोंकणा सेन शर्मा आणि प्रतिभा रांटा स्वत:चा आगामी चित्रपट ‘अक्यूज्ड’वरून चर्चेत आहे. अलिकडेच याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांची पसंती लाभली आहे. अनुभूति कश्यपच्या दिग्दर्शनातील हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे. याची कहाणी सीमा अग्रवाल आणि यश केसवानी यांनी लिहिली असून करण जौहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा यांनी धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Advertisement

अक्यूज्ड ही लंडनमधील एका नामांकित डॉक्टरची कहाणी आहे. डॉक्टरवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झाल्यावर त्याचे आयुष्य विखुरले जाते. याप्रकरणी तपास सुरू होताच त्याच्या अडचणी वाढू लागतात. तपास त्याचे नातेसंबंध आणि अब्रूवर प्रभाव पाडतो. सत्य माहित नसल्यास धारणा लवकरच वरचढ ठरू लागतात असे यात दाखविण्यात आले आहे. एका महिलेच्या आरोपाला केंद्रस्थानी ठेवत तयार करण्यात आलेला हा चित्रपट अस्वस्थता आणि संशयाची कहाणी दाखविणारा आहे.

‘अक्यूज्ड’ हा प्रतिभा रांटाचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती 2023 मध्ये किरण रावचा चित्रपट ‘लापता लेडीज’मध्ये दिसून आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. यानंतर तिला अनेक चित्रपटांचे प्रस्तावही मिळाले आहेत.

Advertisement
Tags :

.