For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीत कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका

10:34 AM Dec 26, 2024 IST | Pooja Marathe
रत्नागिरीत कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका
Konkan's first newborn ambulance in Ratnagiri
Advertisement

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते पार पडला कार्यक्रम

Advertisement

कर्करोग निदान उपकरणे, परिचारिका प्रशिक्षण वाहनांचेही केले लोकार्पण
रत्नागिरी
गोरगरिबांच्या भल्यासाठी, सर्वसामान्यांच्या मुलांसाठी जिल्ह्यात सर्व शासकीय यंत्रणा आणली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय १५ कोटी रुपये खर्चुन अद्ययावत होत असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. येथे आता कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचे लोकार्पण बुधवारी झाले. या सुविधांचा कमीत-कमी वापर व्हावा. सर्वांना निरोगी चांगले आयुष्य मिळावे, असे सामंत यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे, ५ रुग्णवाहिका, परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्योगमंत्री मंत्री सामंत यांच्याहस्ते बुधवारी झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स आता सेवा देणार आहेत. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे, ही आरोग्य सेवेतील महत्वाची बाब आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स ती बजावत आहेत. खासगी डॉक्टरांचेही कौतुक करायला हवे. अनेकांना मोफत उपचार करतात. शुल्क कमी करतात. रुग्णांची काळजी बहिणीप्रमाणे घेता यावी म्हणूनच सिस्टर्स हे नाव देण्यात आले आहे. या क्षेत्रात ४ लाख रोजगार देण्याचा करार जर्मनीने भारताशी केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्सनी आरोग्य यंत्रणेला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचा आदर्श घेवून सध्याच्या डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्याऱ्यांनी कामकाज करावे. ठरवले असते तर माझी वैयक्तिक अनेक महाविद्यालये आणता आली असती. परंतु, मी ते केले नाही. शासकीय केंद्रीय शाळा मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना केंद्रीय शाळांमध्ये शिकता येणार आहे. रत्नागिरीला मला एज्युकेशन हब करायचे आहे ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे इथे रोजगार निर्माण झाला आहे. येत्या काळातही आरोग्य यंत्रणा सेवा देण्याबरोबरच रोजगार निर्मिती करेल या पद्धतीने सक्षम करावयाचे आहे, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.