For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत !

05:48 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत
Advertisement

अनेक रेल्वे गाडया सिंधुदुर्गातील स्थानकात थांबून

Advertisement

मयुर चराटकर
बांदा
गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील मालपे ( पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्यस्थीतीत गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या आहेत तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे कडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून टनेल मध्ये सध्या रेल्वेचे इंजिनिअर गेले असून ते पाहणी करून अहवाल देतील त्या नंतर वाहतूक नियमित सुरू राहील किंवा बंद करण्यात येईल हे ठरविण्यात येणार आहे. तोपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वर्षांपूर्वी अशीच येथील टनेल मध्ये चिखल व पाणी असल्याने काही दिवस वाहतूक बंद होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.