महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकण रेल्वे सावंतवाडीकरांचा नेहमी अपमान करते - मिहीर मठकर

05:53 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

२६ जानेवारीला कोकण रेल्वे विरूद्ध साखळी आंदोलन छेडणार ; मिहीर मठकर, भुषण बांदिवडेकरांचा इशारा

Advertisement

कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता सावंतवाडी रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी सावंतवाडी रेल्वेटर्मिनस प्रेमी मिहीर मठकर यांनी त्यांची सावंतवाडी रेल्वे स्थानकावर भेट घेतली. यावेळी कोरोनात बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच काय झालं ? असा सवाल सीएमडींनी केला. तसेच याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले. राजधानीचे तिकिट सावंतवाडीकरांना परवडणारी नाही. प्रीमियम गाड्या तुम्हाला परवडणाऱ्या नाही अस कोकण रेल्वेकडून सांगून सावंतवाडीकरांचा अपमान केला होता. याप्रसंगी सावंतावडीकरांचा नेहमी कोकण रेल्वेकडून अपमान केला जातो.असे मिहीर मठकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात .आजही कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष स्व.डी के सावंत यांचा अपमान सीएमडींनी केला. डी.केंं.नी आंदोलन केली त्याच पुढे काय झालं ? असं ते म्हणाले. त्यामुळे येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरूद्ध साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर, भुषण बांदिवडेकर यांनी दिलाय.

Advertisement

Advertisement
Tags :
# konkan railway # sawantwadi # mihir mathkar #
Next Article