कोकण हा माझा श्वास : खा. नारायण राणे
मालवण तालुक्यात गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांशी साधला संवाद : ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार ; जनतेचा निर्धार
मालवण | प्रतिनिधी : कोकण हा माझा श्वास आहे. येथील जनता हे माझे कुटुंब आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास, गावात अधिकाधिक सुविधा निर्माण करणे, येथील दरडोई उत्पन्न वाढवणे हा माझा ध्यास आहे. याचं प्रयत्नातून निलेश राणे ही सातत्याने कुडाळ मालवण तालुक्यात काम करत आहेत. जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा विजय निश्चित असून हा विजय मोठया मताधिक्याचा असेल असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री भाजपा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विरोधकांचा खास राणे शैलीत त्यांनी समाचार घेतला. राहुल गांधीला काही समजत नाही. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना दोन दिवस मंत्रालयात गेले. ते विकास काय करणार. तीच स्थिती येथील मतदारसंघात आहे. दहा वर्षे विकास ठप्प आहे. त्यामुळे जनतेनेच आता बदल करणार हे निश्चित केले आहे. असे खा. राणे म्हणाले. तर केंद्र व राज्य सरकारचे विशेष कौतुक खा. राणे यांनी करताना जनहिताच्या योजना राबवणारे व गतिमान विकास करणारे हे सरकार लोककल्याणकारी आहे. असे ते म्हणाले.
खा. नारायण राणे यांनी मालवण तालुक्यातील चाफेखोल, पोईप गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी संवाद साधला. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहनही खा. नारायण राणे यांनी केले. या बैठकानां ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजु प्रभुदेसाई, चाफेखोल गावचे उपसरपंच रविंद्र जाधव, भाजपा महिला ओबीसी तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवासेना जिल्हा पदाधिकारी प्रितम गावडे, दया प्रभूदेसाई, विभागप्रमुख अल्पेश निकम, यांसह अन्य पदाधिकारी चाफेखोल येथे उपस्थित होते. तर पोईप सरपंच श्रीधर नाईक, शिवसेना शाखाप्रमुख स्थानिक पदाधिकारी नारायण राणे, स्वप्निल पोईपकर, बाबाजी नाईक, विभाग प्रमुख कमलेश प्रभू, सुशिल जाधव, लक्ष्मण जाधव, श्रीधर पालव, मिलींद नाईक, शंकर पालव, भरत माने, जयवंत परब, संदिप सावंत, अजय जाधव, अनिकेत सावंत, गोविंद पालव, संदिप जाधव, राजेंद्र धुरी, नम्रता धुरी, सुधाकर पोईपकर, चंद्रकांत नाईक, विश्वनाथ नाईक, उमेश तावडे, पार्थ पालव, रमेश पालव आदी उपस्थित होते.
फोटो : खा. नारायण राणे मालवण तालुक्यात गावभेट दौऱ्यात चाफेखोल, पोईप येथे ग्रामस्थांशी साधला संवाद साधला. यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.