कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोनेरू हम्पी ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरण्याच्या मोहिमेवर

06:08 AM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बटुमी

Advertisement

फिडे वर्ल्ड वुमन्स चेस कप सुरू होत असून भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला त्यात चौथे मानांकन देण्यात आले आहे आणि ती जेतेपदाच्या भक्कम दावेदारांपैकी एक म्हणून सुऊवात करेल. या स्पर्धेतील शीर्ष तीन स्थाने पटकावणाऱ्या खेळाडू पॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र होतील.

Advertisement

चीनच्या लेई टिंगजी, जिनर झू आणि झोंगयी तान या शीर्ष तीन मानांकित खेळाडू आहेत. हम्पीसोबत त्या आशियाई आव्हानाचे नेतृत्व करत आहेत. या विभागात मागील काही काळापासून आशियाई वर्चस्व दिसून येत आहे. कँडिडेट्समधील विजेत्याला पुढील स्पर्धेत चीनची महिला विश्वविजेती वेनजुन जूला आव्हान देण्याचा अधिकार मिळेल.

आघाडीची 21 मानांकने असलेल्या खेळाडूंना दुसऱ्या फेरीत थेट मानांकन देण्यात आले आहे आणि त्यातील भारतीयांच्या यादीत हम्पी, ग्रँडमास्टर डी. हरिका, ग्रँडमास्टर आर. वैशाली आणि दिव्या देशमुख या तब्बल चार खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेची रचना वैशिष्ट्यापूर्ण असून यामध्ये 86 खेळाडू बाद टप्प्यात भाग घेतील. त्यातील 43 विजेते आणि 21 मानांकित खेळाडू मिळून 64 खेळाडू स्पर्धेला पुढे नेतील. वरील चार मानांकित खेळाडूंव्यतिरिक्त वंतिका अग्रवाल, पद्मिनी राऊत, पी. व्ही. नंदीधा, किरण मनीषा मोहंती आणि के. प्रियांका या भारतीय खेळाडूंचाही या स्पर्धेत सहभाग आहे.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article