महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलकाता बलात्कार-हत्येवर उच्च न्यायालयात सुनावणी

06:41 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

याचिकाकर्त्याच्या वकिलांचा राज्य सरकारविरोधात युक्तिवाद

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची बुधवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारने माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र, ही समिती म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी सुरू असलेला निव्वळ दिखाऊपणा असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला. या सुनावणीवेळी काही महत्त्वाच्या मुद्यांवर युक्तिवाद झाल्यानंतर आता या प्रकरणावर 4 सप्टेंबर रोजी सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

उच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी बंगाल सरकारने या प्रकरणाशी संबंधित अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे स्पष्ट केले. यावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवगनम यांनी हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. अहवाल स्वत:कडे ठेवा आणि सर्वोच्च न्यायालयात सादर करा, अशी सूचना केली आहे. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात शेवटची सुनावणी झाली. तेव्हा मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवगनम यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारले होते. सात हजार लोकांचा जमाव हॉस्पिटलची तोडफोड करण्यासाठी आला असताना पोलीस काय करत होते? पोलीसच स्वत:ला वाचवू शकत नसतील तर डॉक्टर निर्भयपणे काम कसे करणार? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता.

ऊग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार-हत्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात पीडितेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कुटुंबीयांना 12 ऑगस्ट रोजी पोस्टमॉर्टम अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची 8-9 ऑगस्टच्या रात्री बलात्कार आणि हल्ल्यानंतर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ही घटना 9 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. चार पानांच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये आरोपींनी महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे क्रूर शोषण केल्याचे म्हटले आहे.

आरोपी संजय रॉय याची लाय डिटेक्टर चाचणी होणार

प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची लाय डिटेक्टर चाचणी होणार आहे. कोलकाता न्यायालयाने यासाठी सीबीआयला परवानगी दिली आहे. संजय 10 ऑगस्टपासून पोलीस कोठडीत आहे. सीबीआयच्या पथकाने काही भागातील सीसीटीव्ही पॅमेऱ्यांचे फुटेज मिळविण्यासाठी कोलकाता पोलीस मुख्यालयाद्वारे प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement
Next Article