Kolhapur : कोल्हापूरची स्वागत कमान जमीनदोस्त !
लवकरच उभारणार नवीन कमान
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या कोल्हापूर प्रवेशद्वारावरील प्रचंड दुरावस्था झालेल्या तावडे हॉटेल येथील प्रवेश कमान महापालिका लवकरच उभारणार नवीन कमान महापालिका प्रशासनाने गुरूवारी रात्री उतरवून घेतली. कमान उतरवताना तावडे हॉटेलकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते.
मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. गुरूवारी रात्री १० वाजता कमान उतरवण्याचे काम सुरू केले. अवघ्या दोन तासात दोन पोकलँडच्या सहाय्याने कमान जमीनदोस्त करण्यात आली. यानंतर जेसीबीच्या सहायाने कमीनाचा भाग उचलण्यात आला. एक-एक टप्पा रिकामा करून कमान उतरवण्यात आली. कमान उतरवण्यासाठी अधिकाऱ्यांसह ३० कर्मचारी, कंत्राटदार, दोन पोकलैंड, दोन जेसीबी व ६ डंपरची व्यवस्था केली होती. सकाळी ६ वाजेपर्यंत हे काम सुरू होते.
ताबडे हॉटेल परिसरातील स्वागत कमानीची प्रचंड दुरवस्था झाली होती. कमानीची अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्यामुळे सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली होती. या कमानीतून चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. कमान कोसळून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या कमानीचा दुरावस्था झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याची दखल घेत प्रशासनाने सदर कमान उतरवून घेण्याचा
निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कमान उतरवून घेतली. या ठिकाणी नवीन स्वागत कमान उभारण्यात येणार असून यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वीच तीन कोटीचा निधी जाहीर केला आहे.
बाहतूक पोलिसांच्या मदतीने उचगाव मार्गे वळविण्यात आली होती. तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून कसबा बावडा, शिये मार्गे वळवण्यात आली होती. तावडे हॉ टेलकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते. कावळा नाका येथून तावडे हॉ टेलकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते.
अलगद कोसळली कमान
कमान उतरवताना अतिशय कौशल्याचा वापर केला. प्रारंभी कमानीचे पीलर हळूहळू निकामी करण्यात आले. त्यानंतर वरचा भाग उतरवल्यानंतर कमान अलगद कोसळली. कमानीचा भाग इतरत्र पडता बरोबर मधोमध पडला.