For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर आधी भारताची हद्दवाढ...?

03:10 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
कोल्हापूर आधी भारताची हद्दवाढ
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

भारताने मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी शहरांनाही टार्गेट करत मिसाईल रोखली. स्फोटांनी पाकभूती हादरली, तळपून निघाल्याने आता ‘ऑपरेशन तंदूर’च्या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सेना पाकिस्तानात घुसल्याने रखडलेल्या कोल्हापूरच्या हद्दीवर भाष्य करताना नेटीझन्स कोल्हापूरच्या अगोदर आता भारताची हद्दवाढ होणार.., या मिम्स्स्नीची धुमाकुळ घातला आहे.

पाकिस्तानात आता ‘जिंदाबाद’च्या जागी ‘जिंदा भाग’चे नारे जोरात बुलंद होत आहेत. आणि हो, कोल्हापूरची हद्द वाढण्याआधीच भारताच्या सीमा विस्ताराच्या गप्पा नेटकऱ्यांनी उडवायला सुरुवात केली आहे. मिम्सचा मारा, पाकिस्तानचा ‘बकरा‘ हारा! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मिम्सनी तर हसून-हसून लोटपोट होण्याची वेळ आणली आहे. एका मिममध्ये दाखवण्यात आलंय की, भारतीय हवाई दलाच्या ड्रोननी पाकिस्तानात तंदुरी चिकनचं ‘स्पेशल डिलिव्हरी’ केलं आणि तिथले दहशतवादी ‘भाग भाग’ करताना दिसत आहेत. दुसऱ्या मिममध्ये एका बकऱ्याला विचारलंय, ‘काय रे, तुझी तब्येत का बिघडली?’ त्यावर बकरा म्हणतो, ‘ऑपरेशन तंदूर ऐकलं का? माझं नाव लिस्टमध्ये आहे.’

Advertisement

एका नेटकऱ्याने तर थेट ट्विट केलं, ‘पाकिस्तानात आता जिंदाबाद नाही, जिंदा भाग चालतंय! भारतीय म्हणत आहे की, ‘छेड़ा तुमने है, छोड़ेंगे हम नहीं!’ जयहिंद. तुम्ही धर्म विचारुन गोळी मारली आम्ही आमचा धर्म सांगून गोळू घालू.

भारताच्या या ऑपरेशननी पाकिस्तानात खळबळ माजवली आहे. काहींनी तर दावा केलाय की, ऑपरेशन तंदूरच्या नावाने पाकिस्तानी मीडियात गोंधळ उडाला आहे. एका व्हायरल व्हिडीओत दाखवण्यात आलंय की, पाकिस्तानी पत्रकार विचारतो, ‘ये तंदूर क्या है?’ आणि त्याच्याच सहक्रायाने उत्तर दिलं, ‘अरे, भारत का नया मसाला! एक बार लगे तो स्वाद जिंदगीभर याद रहता है...!’

भारतातही या मिम्सनी धमाल उडवली आहे. नेटकरी म्हणतायत, ‘पुढचं ऑपरेशन ‘बिर्यानी ब्लास्ट’ असेल, तयारी करा!’ भारतात राजकीय नेत्यांनीही या ऑपरेशनचं स्वागत केलंय, पण सोशल मीडियावर त्यांच्याही मिम्सनी धमाल उडवलीय. एका मिममध्ये दाखवण्यात आलंय की, एक नेता म्हणतो, ‘ऑपरेशन तंदूर यशस्वी झालं!’ आणि खाली कॅप्शन आहे, ‘पण साहेब, तंदूरी चिकनची ऑर्डर कोणी दिली?’ दुसऱ्या मिममध्ये एका नेत्याला विचारलं, ‘पाकिस्तानला काय संदेश?’ त्यावर तो म्हणतो, ‘जिंदाभाग करा, नाहीतर तंदूर चालू!’

  • पाकिस्तानातूनही मिम्सचा ‘प्रतिहल्ला’

पाकिस्तानातूनही काही मिम्स समोर येतायत, पण त्यातून घबराटच जास्त दिसतेय. एका मिममध्ये दाखवलंय की, पाकिस्तानी सैनिक फोनवर बोलतोय, ‘साहब, भारताने तंदूर चालू केलं, आता काय?’ ‘आणि दुसरीकडून उत्तर येतं, “भाग, नाहीतर तंदूरी बनशील!’ काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी भारताच्या मिम्सना उत्तर देताना लिहिलं, ‘तुमचं तंदूर आमच्या बक्रयांना जड गेलं!’ पण भारतीय नेटकऱ्यांनी त्यालाही प्रत्युत्तर दिलं, ‘बकरा नाही, आता तुमची बारी!’

ऑपरेशन सिंदूर आणि तंदूरच्या या मिम्सनी सोशल मीडियावर एक वेगळीच जंग पेटवलीय. भारतात नेटकरी या मिम्सचा आनंद घेतायत, तर पाकिस्तानात ‘जिंदाभाग’च्या नाऱ्यांनी गोंधळ उडालाय. एका नेटकऱ्याने तर थेट लिहिलं, ‘भारताने फक्त तंदूर चालू केलंय, पुढे बिर्यानी आणि गुलाबजामुनची तयारी आहे!’ भारतीय सैन्याच्या या ऑपरेशननी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत, आणि मिम्सनी पाकिस्तानचा पार विचकार करुन टाकला आहे. युध्दजन्य परिस्थितीतही मिम्सनी हास्याचा ‘धमाका‘ केलाय. तुम्हाला काय वाटतं? पुढचं ऑपरेशन काय असेल? ‘बिर्यानी ब्लास्ट‘ की ‘गुलाबजामुन गेमचेंजर’? कमेंटमध्ये सांगा! अशा पोष्टनी सध्या सोशल मिडीयाचे प्लॅटफॉमर्स हाऊस फुल झाले आहेत.

Advertisement
Tags :

.