कोल्हापूरचे प्रवेशव्दार वाहतुकीच्या कोंडीत
कोल्हापूर / रूपाली चव्हाण :
ताराराणी चौक म्हणजे कोल्हापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा चौक म्हणजे शहराची खरी ओळख देत असते. बाहेरून आलेल्या पर्यटकांना या चौकातच कोल्हापूरची खरी पहिली झलक पहावयास मिळते. तावडे हॉटेल, टेंबलाई उड्डाण पूल या मार्गावरून, रात्र-दिवस वाहतुकीची मोठी कोंडी पहावयास मिळत आहे. संध्याकाळनंतर तर महादेव मंदिर ते कावळा नाका चौकापर्यंत खासगी लक्झरी बसेसच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. या वाहनांच्या केंडीबाबत बाहेरील पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. हे चित्र रोज पहावयास मिळत आहे.
ताराराणी चौकात मंदीर, हॉटेल्स, पेट्रोल पंप, कॉलेज, वाहनांचे शोरूम्स, हॉस्पिटल, कार्पोरेट शोरूम्स, मॉल्स या कारणामुळे हा चौक नेहमीच जागा असलेला दिसत आहे. या चौकातूनच पुणा-मुंबई, कर्नाटकालाच जावे लागते. कावळा नाका चौकातच महापालिकेचे गाळे, शेजारी अग्निशमन विभाग व गाड्या यांची कायम वर्दळ पहावयास मिळत आहे. रोडवरच एका इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा भरल्यानंतर व सुटल्यानंतर पालकांची, रिक्षामामांची तसे चारचाकी वाहनांची गर्दी झालेली दिसत असते. उड्डाण पुलावरून पूर्वेकडे वळण्यासाठी चार चाकी वा दुचाकी धारकांना नेहमीच थांबावे लागते. त्यातच सिग्नल पडल्यास या शाळेसमोर वाहनधारकांचे हॉर्न सतत वाजत राहतात. बऱ्याच वेळा वाहनधारकामध्ये वादावादी होण्याचे प्रकार ही पहावयास मिळत आहे.

सायंकाळी शहरात येणारे व शहरातून बाहेर गांवी जाणारे वाहनधारकांची व टॅव्हल्समधील प्रवाशांची मोठी गदीं झालेली दिसत असते. पुणे, मुंबंई, सातारा, गोवा, बेंगलोर, महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये ]िवविध ठिकाणी जाणाऱ्या गाडयाचे बुकींग ही या ठिकाणीच होते. ताराराणी चौकातच जुने विश्रामगृह होते, ते पाडून आता कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम सुरू आहे. बांधकाम झाल्यानंतर पुन्हा एकदा वाहतुकीची गर्दी वाढणार आहे. या चौकातच पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी आहे. या टाकीखाली कचरा उठाव होत नसल्याचे तसेच कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहे.
- चौकातील समस्या :
- हा चौक मोठा असल्याने चारी बाजूने वाहतूकीची कोंडी.
- चौकात चारी बाजूस स्पीडब्रेकर वा झेब्रा पट्टयाचा अभाव
- वाहनधारक सिग्नलच्या नियमांची अंमलबजावणी करत नाहीत.
- रस्त्याच्या डाव्या बाजूस बस स्टॉप असल्याने रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता
- अतिक्रमण
रात्री दहान्ंतर चौकात रोडच्या कडेला ट्रॅव्हल्स पाकिंग केलेल्या असतात़ रस्ता अरूंद असल्याने वाहनाच्या गर्दीत वाढ होत आह़े हॉटेल व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हे गर्दीचे मुख्य कारण आहे. या परिसरात व्यावसायिक अतिक्रमण प्रचंड झालेले दिसून येत आह़े
- वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे गरजेचे
वाहनधारकांनचे सिग्नलकडे लक्ष पाहिज़े मास्टर प्लॅनुसार रस्ता नाह़ी या प्लॅनला बगल देऊन रस्त्याचा मास्टर प्लॅन हा चौकातून डाव्या बाजूस कोल्हापूर सीबीएसकडे तर दुसरा दाभोळकर कॉर्नरकडे दुसरा रस्ता जातो. या चौकातच (राजीव गांधी चौक़) वाहनांची मोठी वाहतुकीची कोंडी होत असते. चौकाच्या जवळच डावीकडे बस स्टॉप आह़े ]िसंग्नल सुटला की रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना रस्त्याच्या प]िलकडे जाताना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागत आहे. अशावेळेस अपघात होण्याचा धोका असून यावर काहीतरी मार्ग काढणे आवश्यक आह़े
- अरुण शिंदे, व्यावसायिक